यावल : प्रतिनिधी । येथे ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपच्यावतीने ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हर्षल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील भुसावळ टी पाँईटवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
या आंदोलनात भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे , पंचायत समिती सभापती सौ .पल्लवी चौधरी , मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी , पं स सदस्य दिपक पाटील , सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजीत चौधरी , नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी , शहराध्यक्ष डॉ . निलेश गडे , जिल्हा सहकारी बँकेचे संचालक गणेश नेहते , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती उमेश पाटील , उज्जैनसिंग राजपुत यांच्यासह पक्षाच्या विविध पदाधिकारी यांनी सहभाग घेतला .