यावल- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील छात्रपती शिवाजी महाराज नगरातील तरूण मित्रमंडळीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला.
राज्याच्या इतिहासातील ६ जुन हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. याच दिवशी संपुर्ण भारतातील परकीय शत्रुंना धुळ चारणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक म्हणजे भारतातील परकीय सतांना एका प्रकारे ईशारा देण्यात आला होता . परकीय शत्रुंवर वचक आणी जरब बसविण्यासाठी शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक करण्यात आला होता . या राज्याभिंषेकानंतर त्यांना संपुर्ण जगात छत्रपती ही पदवी मिळाली होती. यानंतर खऱ्या शिवशाहीचा काळ सुरू झाला होता. अशा छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४९ व्या राज्याभिषेक दिन यावल येथे काल संध्या ६ वाजता अनेक तरूणांच्या उपस्थित राज्याभिषेक दिन मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. हेमंत येवले, बापु जासूद, अशोक येवले, मनोज येवले, अतुल यादव, राहुल येवले , बंटी भोसले, बापु न्हावकर , निलेश बेलदार, तुशार येवले , किरण भगत, शशी यादव ,अनिकेत येवले , किरण भगत ,हर्षल यादव , सचिन येवले ,राम यादव ,तुषार येवले ,विलास येवले शशिकांत यादव ,विक्की येवले , अजिंक्य येवले ,अक्षय भोईटे,दर्शन येवले, यश येवले ,समर्थ येवले , समाधान डुबले ,अक्षित जासुद , वासुदेव वाघ यांच्यासह तरूण मंडळी मोठया संख्येत उपस्थित होती.