चाळीसगावात बंजारा समाजाची आढावा बैठक

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | समाजाला संघटित करून जनजागृती घडविण्यासाठी तमाम बंजारा समाजाच्या वतीने शहरातील अरिहंत मंगलकार्यालयात शनिवार दि. २६ रोजी सकाळी दहाच्या सुमारास आढावा बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लभाना समाज कुंभ यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव शहरातील अरिहंत मंगलकार्यालयात शनिवार दि. २६ नोव्हेंबर  रोजी सकाळी १० वाजता आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संत श्री. गोपाल चैतन्य बाबाजी वृंदावन धाम,पाल ता. रावेर जि. जळगाव यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र राठोड यांनी दिली आहे. दरम्यान संपूर्ण देशात हिंदू गोर बंजारा व लभाना- नायकडा समाज विखुरलेला आहे. यांना संघटीत करून त्यांमध्ये जनजागृती घडविण्यासाठी गोत्री ता. जामनेर जि. जळगाव येथे २५ ते ३० जानेवारी- २०२३ ला कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी या बैठकीला तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Protected Content