यावल प्रतिनिधी । शहरातील कोरोना बाधीत महिलेचा कोविड सेंटरमध्ये उपचार घेतांना मृत्यू झाला असून यामुळे आता येथील कोरोना बळींची संख्या दोन इतकी झाली आहे.
यावल शहरात कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसून येत आहे. काल पहाटे उपचार सुरू असतांना मृत झालेल्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. यानंतर काल रात्री जळगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असणारी ५९ वर्षाची महिला देखील मृत झालेली आहे. शहरातील पूर्णवाद नगरातील रहिवासी असणारी ही महिला कोरोना पॉझिटीव्ह असून तिच्यावर कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्हाटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर, पूर्णवाद नगर हा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून हा भाग सील करण्यात आला आहे.
दरम्यान, डांभुर्णी येथील तीन महिन्यांची बालीका कोरोना सदृश्य व्याधीने मृत झाली होती. तिचा स्वॅब सँपल हा आज सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणांना थोडा दिलासा मिळाला आहे.