काचिन (वृत्तसंस्था) म्यानमारमधील काचिन राज्यातील जेड-समृद्ध हापाकांत क्षेत्रात शेकडो मजुर दगड फोडण्याचे काम करत होते. त्यावेळी अचानक झालेल्या भूस्खलन तब्बल ५० मजुरांचा मृत्यू झाला आहे.
काचिन राज्यातील जेड-समृद्ध हापाकांत क्षेत्रात अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळात अचानक भूस्खलन झाले आणि सर्व मजुर जमिनीखाली दबले गेले. म्यानमारच्या अग्निशमन विभागाने माहिती देतांना सांगितले आहे की, सध्या ५० शव बाहेर काढण्यात यश आले असून बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेत आणखी लोकं अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भागात गेल्या एका आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे बचावकार्यातही अडथळा निर्माण होत आहे.