मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मोबाईल अथवा अन्य वस्तू गहाळ वा चोरी झाल्यास हरवल्याची किंवा मिसिंगची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल केली जात होती, परंतु यापुढे मोबाईल अथवा अन्य वस्तू गहाळ वा चोरी झाल्यास या संदर्भात थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिले आहेत.
पूर्वी कोणतीही वस्तू गहाळ चोरी झाल्यास त्याची तक्रार पोलिसात मिसिंग रजिस्टरमध्ये नोंद केली जात होती, परंतु आता संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांना तक्रारदाराची तक्रार एफआयआर दाखल करावी लागणार आहे. एफआयआर नोंदविण्यात हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे निर्देश मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिले आहेत.
एकाद्या व्यक्तीने मोबाईल चोरी वा हरविल्याची तक्रार दिली तर मोबाईल चोर अन्य जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात फरार झाला आणि मोबाईल विकल्यास फारफार तर १० हजाराहून कमी किंवा जास्त किमत मिळते, त्यामुळे अशा तक्रारीसाठी अधिकारी पदरमोड करून सखोल तपासासाठी जातच नाहीत, त्यामुळे मोबाईल चोरांचे जास्तच फावते, परंतु आयुक्त संजय पांडे यांच्या निर्देशानुसार आता पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याना मिसिंग तक्रार ऐवजी गुन्हा दाखल करून तपास करावा लागणार आहे. आणि त्यानुसार न्यायालयात फेऱ्या माराव्या लागणार आहेत.