मोनाली कामळस्कर फाऊंडेशनतर्फे ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधांचे मोफत वाटप

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मोनाली कामळस्कर फाऊंडेशनने लॉकडाऊन काळात राधाकृष्ण मंगल कार्यालयात कोरनटाईन केलेल्या परप्रांतीय नागरिकांसाठी ३९ दिवस जेवण, नास्ता, चहा, पाणी व्यवस्था चोख केली होती तसेच ९७ समाज बांधवांना अन्नधान्य (किराणा समान) वाटप करून मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या मोनाली कामळस्कर फाऊंडेशनने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काथार वाणी समाजातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून ५०० बॉटल्सचे मोफत वितरण करण्यात आले. मोनाली कामळस्कर फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधाकर वाणी यांच्या उपस्थितीत औषधींचे परीसरनुसार नंदकिशोर कामळस्कर, विजय वाणी, राहुल हरणे, ललित वाणी प्रमोद वाणी यांनी वर्गीकरण केले. फाऊंडेशनचे संस्थापक नंदकिशोर कामळस्कर यांनी विनोद वाणी, श्री दिलीप वाणी श्री शरद वाणी व रेडक्रॉस सोसायटी जळगांवचे डॉ.रेदासनी यांचे आभार मानले.

आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांच्या ५०० बॉटल संपूर्ण जळगाव शहरात व आजूबाजूच्या खेड्यात तसेच पुणे व नासिक येथील समाज बांधवांना मोफत वाटप करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी अजय कामळस्कर, राजेश वाणी, अनंत काश्यप, वासुदेव वाणी, रवींद्र वाणी, अनिल वाणी, प्रमोद वाणी, नितिन चंदनकर, शंकर वाणी, शरद वाणी, राहुल हरणे, विजय वाणी, किशोर कामळस्कर, सुधाकर वाणी, धुळे येथे हर्षल कामळस्कर श्री रवींद्र दापोरकर, स्वप्नेश वाणी, मिलिंद वाणी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content