नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले पॅकेज २० लाख कोटींचे नसून केवळ ३.२२ लाख कोटींचे आहे. एवढेच नव्हे तर हा आकडा जीडीपीच्या केवळ १.६ टक्केच आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. अगदी ही आकडेवारी खोडून काढण्याचे आव्हान देखील कॉंग्रेसने भाजपला दिले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेनंतर आनंद शर्मा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. मोदी सरकारचा २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा खोटी आहे. खरं पॅकेज केवळ ३.२२ लाख कोटींची आहे. हा आकडा जीडीपीच्या केवळ १.६ टक्केच आहे. माझे केंद्रीय अर्थमंत्र्यांना, मोदी सरकारला थेट आव्हान आहे, की त्यांनी मी दिलेली आकडेवारी खोडून दाखवावी. त्यांच्यासोबत खुली चर्चा करण्याची माझी कधीही तयारी आहे,असेही आव्हान काँग्रेस प्रवक्ते शर्मा यांनी भाजपला दिले आहे.