मोदी आता अर्थसंकल्पावर बोलणार

 

 

नवी दिल्ली :वृत्तसंस्था ।  संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. संसदेत आज अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सदनात बोलणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून लोकसभा खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.

 

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना संसदेला संबोधित केलं होतं.

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरही उत्तर देणार आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधीही आपलं म्हणणं संसदेसमोर मांडणार आहेत.  भारतीय जनता पक्षानं आपल्या लोकसभा खासदारांना सदनात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केलाय.

 

 

 

 

आज सर्वात अगोदर राज्यसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे साधारणपणे अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा होते. परंतु, १९५५, १९५९, १९६३, १९६५ आणि २००२ मध्ये लोकसभेआधी राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा झाल्याचं दिसून येतं.

 

 

काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी सदनातील अनेक सदस्यांना अर्थसंकल्पावर बोलण्याची इच्छा असल्यानं चर्चेचा वेळ १० तासांवरून वाढवून १२ तासांचा करण्यात यावा, अशी मागणी केलीय.

Protected Content