नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मोदीजी जेव्हा तुम्ही काँग्रेसचे निवडून आलेले सरकार अस्थिर करण्यामध्ये व्यस्त होता, तेव्हा जागतिक स्तरावर कच्चा तेलाच्या दरातील ३५ टक्के घसरणीकडे तुमचे लक्ष गेले नाही, अशा शब्दात मध्य प्रदेशमधील सध्याच्या राजकीय नाट्यमय घडामोडींवर राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशुन ट्विट केले आहे की, जेव्हा तुम्ही काँग्रेसचे निवडून आलेले सरकार अस्थिर करण्यामध्ये व्यस्त होता, तेव्हा जागतिक स्तरावर कच्चा तेलाच्या दरातील ३५ टक्के घसरणीकडे तुमचे लक्ष गेले नाही . कृपया तुम्ही पेट्रोलचे दर ६० रुपये प्रति लिटरपर्यंत कमी करून देशातील नागरीकांना याचा लाभ देऊ शकता का? यामुळे देशाच्या रखडलेल्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. दरम्यान, मध्य प्रदेशातील २२ आमदारांनी राजीनामे दिले असल्याने मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार देखील संकटात आले आहे.