जळगाव (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्याला विधानपरिषदेवर संधी दिली जाते. पण आम्ही चाळीस वर्षे निष्ठेने काम केले. भारतीय जनता पार्टी कोणत्या दिशेने चालली, यावर चिंतन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
भाजपने विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विधानसभेनंतर विधानपरिषदेचेही उमेदवारी डावलल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे संतापले आहेत. ‘मोदी गो बॅक’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्याला विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाते, असा शब्दात एकनाथ खडसेंनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांच्या उमेदवारी नाकारली आहे. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी काही दिवस आधी मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकून ‘गो बॅक मोदी’ असा नारा लगावला होता. तर लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले होते. तर गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढली होती. याशिवाय नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि भाजपच्या मेडिकल सेलचे अध्यक्ष असलेले नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना देखील उमेदवारी दिली आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/255897909117466/