जळगाव -लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील मेहू येथे एकाचे बंद घर फोडून घरातून १२ हजाराची रोकड आणि मोबाईल चोरून नेणाऱ्या तीन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तिघांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. तिघांना पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील मेहू येथील रहिवाशी योगेश वना चव्हाण हे वास्तव्याला आहे. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घराच्या किचनच्या खिडकीतून घरात प्रवेश करत घरात ठेवलेले १२ हजाराची रोकड आणि महागडा मोबाईल चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला होता. यासंदर्भात योगेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात ४०१/२०१९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक तयार केले. या पथकात पोहेकॉ संदीप पाटील, पो.ना. प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाने, सचिन पाटील, तांत्रिक टीम मधील पोहेकॉ संदीप साळवे, ईश्वर पाटील, चालक अशोक पाटील, मुरलीधर बारी यांचे पथक तयार करून त्यांना रवाना केली. त्यानुसार पथकाने संशयित आरोपी कृष्ण अभिमन वाघ, विशाल जगदीश पाटील आणि रोहित सुनील पाटील तिघे रा. मेहू ता. पारोळा यांना ताब्यात घेतले. पोलीसांनी त्यांची चौकशी केली असता चोरी केल्याची कबुली दिली. तिघांना अटक करून पारोळा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.