त्यांच्या दारात उजेड देण्यासाठी आपण आहोत – अनिल डोये

बुलढाणा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्राहकांच्या दारात अंधार करण्यासाठी आपली सेवा नसून त्यांच्या दारात उजेड देण्यासाठी आपण आहोत असे प्रतिपादन महावितरण मुख्य अभियंता अकोला परिमंडल अनिल डोये यांनी केले.

 

अनिल डोये हे   जिल्ह्यातील सर्व महावितरण अभियंते,अधिकारी, कर्मचारी, आणि जनमित्र यांची कलेक्टर हॉल आयोजित बैठकीत बोलत होते. या आढावा बैठकीत वीज ग्राहकांना सेवा देण्यासोबतच, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे पैसे वसूल होणे अत्यंत आवश्यक असून सोबतच ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा व पथदिव्यांची वसुली करण्याच्या सूचना मुख्य अभियंता अनिल डोये यांनी दिल्यात. पुढे बोलतांना ते म्हणाले की, ग्राहकांच्या दारात अंधार करण्यासाठी आपली सेवा नसून त्यांच्या दारात उजेड देण्यासाठी आपण आहोत. परंतु, वारंवार विनंती करून देखील, दिलेल्या योजनांचा, सुविधांचा लाभ ग्राहक घेत नसेल तर नाईलाजास्तव अशा थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करावा. कारण महावितरण आर्थिक अडचणीत असून या कठीणप्रसंगी प्रत्येक महावितरण अधिकारी, कर्मचारी यांनी निष्ठेने कंपनीकरिता भरीव योगदान देणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. बुलढाणा जिल्ह्या हा कृषी प्रवण जिल्ह्या असून जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत कृषी वीज धोरण २०२० ची माहिती पोहचवून प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा. तसेच अकृषक ग्राहकांना नव्याने येत असलेली विलासराव देशमुख अभय योजनेबद्दल माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्यात. कोरोनाकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता वीज कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवेबद्दल गौरव पूर्ण उदगार काढीत पुढेही अशीच दर्जेदार सेवा आपल्याकडून दिल्या जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
बुलढाणा जिल्ह्यात आढावा बैठकीतील अपेक्षेप्रमाणे काम होईल असे आश्वासन यावेळी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संजय आकोडे यांनी दिले. यावेळी जिल्ह्यातील मलकापूर, बुलढाणा, खामगाव विभागाचे तीनही कार्यकारी अभियंता , कर्मचारी जनमित्र,उपस्थित होते.

Protected Content