मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या स्थायी व विषय समिती सभापतींची बिनविरोध

मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या पाचही स्थायी  व विषय समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत प्रतिस्पर्धी नामनिर्देशन अर्ज न आल्याने उपाध्यक्ष पदसिद्ध सभापती पद वगळता शिवसेनेच्या नगरसेवकांची व नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांची चारही स्थायी विषय समितीच्या सभापती पदावर बिनविरोध नियुक्ती झाली असून याची अधिकृत घोषणा पिठासिन अधिकारी तहसिलदार श्वेता संचेती यांनी केली.

प्रसंगी मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक दीपक जग्रवाल, कर निरीक्षक अच्युत निल, सभा लिपिक मयूर महाजन आदींची उपस्थिती होती.

स्थायी व विषय समित्या खालील प्रमाणे सभापती निवड
1) सार्वजनिक बांधकाम समिती सभापती संतोष सुपडू मराठे, 2)स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती नुसरतबी महेबूब खान, 3) पाणीपुरवठा व जलनिस:रण समिती मुकेशचंद्र कैलास वानखेडे, 4)महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता सुभाष भलभले, 5)शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती उपाध्यक्ष मनीषा पाटील ( पदसिद्ध)

यांची होती उपस्थिती
उपनगराध्यक्ष प्रभारी नगराध्यक्ष मनीषा पाटील, गटनेता निलेश शिरसाट, गटनेता राजेंद्र हिवराळे, नगरसेवक मुकेशचंद्र वानखेडे ,  संतोष कोळी , पियुष मोरे, संतोष मराठे , शे. शकील खाटिक नगरसेविका सविता भलभले, शबानाबी अब्दुल आरिफ, बिलकीसबी अमाउल्ला खान, नुसरतबी महेबूब खान, साधना ससाणे, कुंदा पाटील , नगरसेवक  ललित शांताराम महाजन , डॉ प्रदीप पाटील उपस्थित होते.

Protected Content