मेहुल चोक्सीने सोडले भारतीय नागरिकत्व

नवी दिल्ली वृत्तसंस्था । फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी यानें एंटीगा उच्चायुक्तालयात आपला भारतीय पासपोर्ट जमा करत भारतीय नागरीकत्व सोडल्याने त्याच्या प्रत्यार्पणात अडसर निर्माण झाला आहे.

पंजाब नॅशनल बँकेत १४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच चोकसी फरार झाला होता. याच प्रकरणात चोक्सीचा भाचा नीरव मोदी हा देखील आरोपी आहे. भारताने चोक्सीला आणण्याच्या हालचाली सुरू केल्या असतांना त्याने भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला. यासाठी त्याला १७७ अमेरिकी डॉलर्सचा ड्राफ्ट जमा करावा लागला. आपण नियमांच्या अधीन राहूनच एंटीगाचं नागरिकत्त्व घेतलं असून भारताचं नागरिकत्त्व सोडलं आहे, अशी माहिती चोक्सीनं उच्चायुक्तालयाला दिली आहे.

Add Comment

Protected Content