याबाबत अधिक माहिती अशी की, सुकदेव माळी हे रंवजे ता. एरंडोल येथील रहिवाशी आहे. दरम्यान, त्यांना पाच विवाहित मुली असून पत्नीचे दोन वर्षांपुर्वी निधन झाले आहे. त्यामुळे ते घरी एकटेच राहत होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी रवंजा गावातून निघून मिळेल त्याठिकाणी राहत होते. दरम्यान, शुक्रवार १० जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेहरूण ट्रॅक येथे त्यांचा मयत स्थितीत मृतदेह आढळून आला. नेमका त्यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळाली नाही. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी धाव घेतली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, सुकदेव माळी हे गेल्या सहा महिन्यापासून घरातून कुणाला काहीही न सांगता निघून गेले होते. त्यांच्यासोबत असलेल्या पिशवीत आधार आढळून आल्याने त्यांची ओळख पटली. त्यांच्या पश्चात पाच विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परीवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मेहरूण तलावाजवळ वयोवृध्दाचा मृतदेह आढळला
3 years ago
No Comments