मुक्ताईनगर प्रतिनिधी । नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोकराचे मुंबई येथील प्रमुख मृदा विशेषज्ञ भाऊसाहेब बर्हाटे यांनी आज मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या (पोकरा) प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या अंतर्गत प्रमुख मृदा विशेषज्ञ भाऊसाहेब बर्हाटे यांनी आपल्या सहकार्यांसह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन शेतकर्यांशी संवाद साधला आहे. यात त्यांनी योजनांचा आढावा घेऊन याच्या अंमलबजावणीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. काल त्यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकर्यांना मार्गदर्शन केले होते. तर आज मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव, पिंप्री-नांदू या गावांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर त्यांनी पिंपरूड फाटा (ता. यावल) येथे असणार्या दि तापी बनाना व्हॅली फार्मर्स को-ऑपरेटीव्ह सोसायटीला भेट दिली. येथे केळीच्या खोडापासून धागा बनविण्यासह अन्य उत्पादने घेण्यात येतात. बर्हाटे यांनी या कारखान्यातील सर्व प्रक्रियांची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी भाऊसाहेब बर्हाटे यांच्यासोबत उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ तुषार देसाई, तालुका कृषी अधिकारी आदींची उपस्थिती होती.