रावेर : प्रतिनिधी । गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज बोरखेडा येथील हत्या झालेल्या भावंडांच्या कुटुंबीयांची भेट घेतली याप्रसंगी त्यांनी मृतांच्या वारस कुटुंबांना घरकुल जमीन आणि आर्थिक मदत देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले
याबाबत सविस्तर वृत्त असे की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दुपारी बोरखेडा येथील पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले याप्रसंगी त्यांनी पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन केले गृहमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना निर्देश देत संबंधित पीडित कुटुंबाला घरकुल, आर्थिक मदत आणि जमीन देण्याचे निर्देश दिले याप्रसंगी त्यांच्यासमवेत आमदार शिरीषदादा चौधरी , आमदार अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते