५७ लाख ८६ हजारांच्या गुटख्यासह ट्रक जप्त

जळगाव : प्रतिनिधी । स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेऊनबरे ते जळगावं असा रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत सिनेस्टाइल पाठलाग करून ५७ लाख ८६ हजारांच्या गुटख्यासह ९ लाखांचा ट्रक जप्त केला आहे . चालक आणि क्लिनरला अटक करूंन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे .

स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक मनोज दुसाने यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, धुळेकडून चाळीसगावकडे ट्रक (क्र.एमएच 18/एम 0553 ) ट्रकमध्ये गुटखा येत आहे. त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम हे रावेरला असल्याने त्यांनी
सहाय्यक फौजदार नारायण पाटील, पो हे कॉ रामचंद्र बोरसे, प्रविण हिवराळे व चाळीसगावचे पो कॉ महेश पाटील यांना माहिती कळविली. नारायण पाटील यांनी दोन पंचांना स्थानिक गुन्हे शाखेच्या जळगाव कार्यालयात बोलावून कारवाईबद्दल कळविले . त्यानंतर पंच आणि पोलिसांचे पथक मेहूणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुळे-चाळीसगाव रोडवरील गिरणा नदी पुला जवळ खाजगी वाहन आडोशाला उभे करुन वाट पहात उभे असता काल रात्री 23.10 वाजता हा ट्रक त्यांना दिसला चालकाला हात दाखवून हात देवून थांबविण्याचा प्रयत्न केला थांबवणारे पोलीस असल्याचे समजल्यावर चालकाने ट्रक थांबवली नाही, म्हणून पथकाने खाजगी वाहनात बसून टूकचा पाठलाग केला पहाटे 4.00 वाजता .जळगावजवळ जैन हिल्स येथे पोलिसांनी टूक थांबविला.

चालक व क्लिनर ट्रकमध्ये होते. ट्रक चालकास ओळखपत्र दाखवून विचारपुस केल्यावर त्याने सांगितले की, ट्रक मध्ये विमल गुटखा आहे. असल्याचे सांगितले . ट्रक मालक/चालक मसुद अहमद शब्बीर अहमद (वय 38 रा.संगमेश्वर मालेगाव ) व क्लिनर मोहम्मद अय्युव दिन मोहम्मद ( 50 , मालेगाव) अशी त्यांची नावे आहेत हा माल कोणाचा आहे असे विचारल्यावर चालकाने सांगितले की, मला एक मोबाईल नंबर मिळाला होता, त्याचे नाव माहित नाही. आता माझ्याकडे त्याचा मोबाईल नंबर नाही असे तो म्हणाला हा माल नवापूर येथून भरुन मिळाला त्याचे नाव माहित नाही असे सांगून उडवाउड़वीचे उत्तरे दिली ट्रक मध्ये गुटखाच्या माल जास्त असल्याने
सरक्षिततेच्या दृष्टीने ट्रक जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणला गेला तेथे झडती घेण्यात आली . त्यानंतर या आरोपींविरोधात गुन्हा नोंदवून जप्त केलेला गुटखा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे .

 

 

 

Protected Content