जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मू. जे. महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागच्यावतीने ‘मानसिक सक्षमीकरण आणि मानसिक आरोग्य’ या विषयावर डॉ. मयूर मुठे (मानसतज्ञ) जळगाव यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
सदर व्याख्यानात डॉ. मुठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मानसिक आरोग्याचे शत्रू आणि आधारस्तंभ सांगितले तसेच मानसिक आरोग्य या विषयावर मानसिक विकृतीची कारणे, लक्षणे व उपचार मार्गदर्शन करण्यात आले तसेच समस्याग्रस्त व्यक्तीला आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनी, मित्रांनी, शिक्षकांनी व कुटुंबातील सदस्यांनी समजून घेवुन त्यांच्यासोबत संवाद साधण्यासोबत मानसोपचाराची सुद्धा गरज असते. जसे आपण शारीरिक आरोग्याची काळजी घेतो तशीच काळजी मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी घेणे आवश्यक आहे. आज जगात मानसिक विकृतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यामध्ये कोरोना महामारी आणि इन्टरनेट व्यसनांनी खूप मोठी भर पडली आहे याची जाणीव मार्गदर्शनात करून दिली. याची दखल आता घेतली नाही तर भविष्यात मानसिक विकृतीची सर्वात मोठी समस्या निर्माण होईल म्हणून आज सुद्रुड मानसिक आरोग्य राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बालाजी राऊत, प्रास्ताविक प्रा. डॉ. सी. पी. लाभणे, विभाग प्रमुख मानसशास्त्र विभाग यांनी केले. प्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. ललिता निकम, डॉ. राणी त्रिपाठी व राहुल पाटील इ. उपस्थित होते. सादर कार्यक्रमात महाविद्यालयातील ८२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.