मू.जे. महाविद्यालयात “जळगाव आयडॉल” कार्यक्रम उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मूळजी जेठा महाविद्यालय इव्हेंट मॅनेजमेंट विभागतर्फे जळगाव आयडॉल 2023 हा कार्यक्रम आयोजित केला होता. या स्पर्धेत 22 स्पर्धेकांची चाचणी घेऊन निवड करण्यात आली होती. सर्व 22 स्पर्धेकांनी उत्कृष्ट पद्धतीने गीत गात स्पर्धेत रंग भरला.

 

या 22 स्पर्धांमधून टॉप पाच विजेते घोषित करण्यात आले. व जळगांव आयडॉल 2023 हा सन्मान वरुण नेवे यांनी पटकवीला.प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत वदोडकर (सांस्कृतिक समन्वयक के सी ई सोसायटी) डॉ निलेश चांडक (सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ )जळगांव, पी ई पाटील(अध्यक्ष जिजामाता फॉउंडेशन) महाविदयालयाचे प्राचार्य सं. ना. भारंबे ,प्रसाद जोशी(हॉटेल जोशाही गार्डन) अभिलाष नागला ,नंदग्राम गोधाम भुसावळ हे होते.. कार्यक्रमात परीक्षक म्हणून पद्मजा नेव( प्राचार्या गोदावरी संगीत महाविद्यालय) व अमित माळी ( एस पी ऑफिस जळगाव ) होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी इव्हेंट विभागाचे पंकज कासार व सम्पूर्ण टीम यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय दुसाने यांनी केले.

 

जळगाव आयडॉल २०२३ स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे

प्रथम- वरुण नेवे, द्वीतीय… नाजनीन शेख, तृतीय.. रितेश भोई , उत्तेजनार्थ -अंजली मोरे, नितीन वाघ, निकिता जोशी.

Protected Content