जळगाव, प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालय एन.सी.सी. युनिटच्या छात्र सैनिकांनी कोरोना काळात संविधान जनजागृती मोहिम दिनांक २४ ते २८ ऑगस्ट २०२० दरम्यान शपथ घेणे, संविधानावर आधारीत प्रश्न मंजुषा आणि ओंलीने वेबीनार घेण्यात आलेत.
संविधान जनजागृती मोहीम संदर्भांत ९० छात्र सैनिकांनी संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून शपथ घेतली. १०० छात्र सैनिकांनी संविधानावर आधारित प्रश्न मंजुषेत सहभाग घेतला. तर २८ छात्र सैनिकांनी ऑनलाईन वेबीनार मध्ये सहभाग घेऊन सिनिअर अंदर ऑफिसर तेजेश पाटील आणि कॅडेट शंतनू पिंपळे याने संविधानावर आधारित माहिती सदर केली.
या जन जागृती मोहिमेमुळे छात्र सैनिकांना संविधानाची सविस्तर माहिती मिळाली. १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालीयनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सत्यशील बाबर, सुभेदार मेजर कोमल सिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. भारंबे, एन.सी.सी. अधिकारी लेफ्ट. डॉ. बी. एन. केसुर आणि लेफ्ट. डॉ. योगेश बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.