जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मु.जे.महाविद्यालयात जिल्हा विभाग क्रीडा समिती व शिक्षणशास्त्र विभागाच्यावतीने रविवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
खो- खो स्पर्धेचे उद्घाटन खिरोदा येथील बी.एड. कॉलेजचे प्राचार्य साहेबराव भुकन, मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य स.ना. भारंबे यांच्याहस्ते नाणे फेकून करण्यात आले. याप्रसंगी केसीई बीपीएड महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक राणे, श्रीकृष्ण बेलकर, पी..आर. चौधरी, अनिता कोल्हे, राजेंद्र भालोदकर, योगेश महाजन, मुकेश पवार, पंच जितेंद्र पाटील, अमर हटकर, गणेश मांडोळे, विनोद मांडोळे आणि आयोजन प्रविण कोल्हे आणि निलेश जोशी यांची प्रामख्याने उपस्थिती होती.
खो-खो स्पधेत महिला संघात सोशल वर्क कॉलेज, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव, शिरीश मधुरराव चौधरी महाविद्यालय, आयएमआर महाविद्यालय, जी.डी. बेंडाळे महाविद्यालयात यांनी सहभाग घेतला तर पुरूष संघात नुतन मराठा महाविद्यालय, शिरीश मधुकरराव चौधरी महाविद्यालयात, भालोद महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, समााज कार्य महाविद्यालयात आणि आयएमआर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.