मुस्लिम बांधवांचे विविध मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । मध्यप्रदेशातील एका गावात काही समाजकंटकांनी मशिदीवर चढून नुकसान केल्याप्रकरणी जळगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी निषेध करून दोषींना अटक करून कडक करवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना निवेदन देण्यात आले.

आपली प्राचीन भारतीय संस्कृती गंगा जमुना तहजीव (राष्ट्रीय एकात्मता) ची राहिलेली असून सर्वधर्मसमभाव अशी आपल्या देशाची ओळख आहे. संविधानाने सर्व धर्म, जात, पंच, समाजांना एक समान हक्क व स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. असे असताना सुद्धा काही जातीयवादी समाजकंटक स्वामी त्याला मानत नाही, ज्यांच्या लोकशाहीवर विश्वास नाही असे समाजकंटक वारंवार दोन समाजात तेढ निर्माण होईल या हेतूने कार्य करत आहे. याच पध्दतीने मध्यप्रदेशातील चांद खेडी जि. मंदसौर येथे काही समाज कंटकांनी मशिदीवर चढून नुकसान केले आहे. तसेच गावात राहणाऱ्या अल्पसंख्याक समुदायाच्या घरांवर तोडफोड करण्यात आली आहे. हे अत्यंत निंदनिय आहे. अशा दोन समाजात तेढ निर्माण होईल अश्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी आज जिल्हाधिकारी यांना मुस्लिम समाज बांधवांतर्फे निवेदनाद्वारे केली आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/1437624626441752

Protected Content