जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील एका भागात राहणाऱ्या प्रौढ व्यक्तीच्या मुलीची समाजात बदनामी करून झालेला साखरपुडा व ठरलेले लग्न खोटे आरोप लावून मोडून टाकत सुमारे ४ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी २० मे रोजी रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शहरात छत्रपती शिवाजी नगरातील एका भागात ४५ वर्षीय व्यक्ती हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मुलीचा साखरपुडा समाजाच्या मुलाशी झालेला होता. दरम्यान, मुबिन सत्तार काकर, सत्तार अहमद काकर, रईसा सत्तार काकर, शोएब शेख अजीज आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी मिळून प्रौढ व्यक्तीच्या मुलीची समाजा बदनामी केली. एवढेच नाही तर झालेला साखरपुडा आणि ठरलेले लग्न देखील मोडून ४ लाख रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. प्रौढ व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी २० मे रोजी शहर पोलीस ठाण्यात मुबिन सत्तार काकर, सत्तार अहमद काकर, रईसा सत्तार काकर, शोएब शेख अजीज आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.