Home आरोग्य रुग्णाच्या नातेवाइकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

रुग्णाच्या नातेवाइकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

0
142


 

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कक्ष क्रमांक ९ मध्ये विविध व्याधीवर उपचार घेण्यासाठी नागपूर येथील तरुण दाखल झालेला आहे. मात्र त्याला त्याचा पत्ता सांगता येत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

रुग्णाचे नाव विनोद देवांगण असे आहे. तो नागपूर येथे महामार्गावर बाजार भरतो, तिथे मंदिराच्या मागे पाण्याच्या टाकीजवळ गंगाराम देवांगण नामक नातेवाईक राहतात असे सांगत आहे. तसेच, नागपुरातील फुकटपुऱ्यात मुश्ताकभाई नावाच्या इसमाला देखील ओळखीचा आहे, म्हणून सांगत आहे. तरी नातेवाईकांनी संदीप बागुल (९८२३८७६३६४) यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने कळविले आहे.


Protected Content

Play sound