कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील वनकोठे बांभोरी खुर्द येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदिप गुलाबराव वाघ यांनी कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलाचा वाढदिवस थाटात साजरा न करता वाढदिवसानिमिताने ग्रामस्थांना मास्कचे वाटप केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदिप वाघ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलाचा अर्जुन याचा वाढदिवस थाटात साजरा न करता गावातील नागरिकांना स्वखर्चाने कापडी, खराब न होणारे मास्क वाटप करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. अनेक ठिकाणच्या ग्राम पंचयत सरपंच यांनी हा उपक्रमराबवित आहेत. यानुसार कासोद्यात ही भैय्या राक्षे यांनी गावात हजारो मास्क वाटप केले. परंतु ,वनकोठे बांभोरी खुर्द गृप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच यांच्या विषयी लोकांनी नाराजी दर्शवली आहे . तर संदिप वाघ व भैय्या राक्षेयांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाघ यांनी लोकांना आवाहन केले आहे की, शासनासह प्रशासनास व पोलीस बांधव , आरोग्य सेवक , पत्रकार यांना सहकार्य करा .विनाकारण घराबाहेर निघू नका . कोरोना वर मात करण्यासाठी शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करा.