भुसावळ : प्रतिनिधी । साकरी येथे महसुल विभागाने अवैध गौण खनिजाची वाहतुक करणारे सहा डंपर मुरुमासह ताब्यात घेतले आहे . या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतुक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे .
मुरुमाची वाहतुक करणाऱ्या सहा डंपर गाडी चालकाकडे परमिट नसल्याचे साकरी येथील तलाठी मनिषा गायकवाड यांनी म्हटले आहे शासनाच्या नियमानुसार गौण खनिज वाहतुक करणारे डंपर ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तलाठी मनिषा गायकवाड यांनी म्हटले आहे.
साकरी येथील सोपान भारंबे यांनी म्हटले आहे कि , आईस प्रोकाँन कंपनीने साकरी गावाचे खराब झालेले रोड व गावातील अंतर्गत रस्ते बनवून देण्याचे आश्वासन दिले होते . मात्र आज पर्यंत बनवले नाही . या कंपनीने हायवेचे काम घेतलेले आहे .ती गुजरातची कंपनी आहे कि कुठली हे मला माहिती नाही असे देखील सोपान भारंबे यांनी म्हटले आहे .
कारवाई भुसावळचे तलाठी ठाकुर ,वरणगावच्या तलाठी कल्पना गोरले , सुनसगावच्या तलाठी जयश्री पाटील साकेगावचे तलाठी बारी व तळवेलचे तलाठी पवार यांनी केली आहे .
https://www.facebook.com/508992935887325/videos/337788124456026