मुनव्वर राणांंच्या अटकेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी  । उर्दू शायर मुनव्वर राणा याने महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत महर्षीची तुलना तालिबान्यांशी केली आहे. या वक्तव्याचा अखिल भारतीय कोळी समाज आणि मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्टच्या वतीने निषेध व्यक्त करत शायर मुनव्वर राणा याला अटक करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

 

निवेदनाचा आशय असा की, देशातील प्रसिध्द उर्दू शायर मुनव्वर राणा याने महर्षी वाल्मिक ऋषी यांची तुलना तालिबान्यांशी केली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महर्षी वाल्मिकी यांना दरोडेखोर संबोधत त्यांची तुलना तालिबान्यांशी केली आहे,  असे आक्षेपार्ह वक्तव्य करून समस्त हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या आहे.  आजवर देशवासियांनी मुनव्वर राणा याला डोक्यावर घेतले तेच राणा आता हिंदू धर्माविरूध्द गरळ ओकत सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.  मुनव्वर राणा यांच्या वक्तव्यामुळे देशातील सामाजिकता व एकात्मता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुनव्वर राणाने केलेल्या वक्तव्याचा जाहीर माफी मागावी आणि पोलीसांनी त्यांच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे अश्या विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय कोळी समाज आणि मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्टच्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले. या निवेदनावर मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट धनराज साळुंखे, योगेश बाविस्कर, दौलत कोळी, ॲड. रमाकांत सोनवणे, गणेश कोळी, गोकुळ सपकाळे तर अखिल भारतीय कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष धनराज साळुंखे,  अनिल नंनवरे, रमाकांत सोनवणे, योगेश बाविस्कर, आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/143806311237383

 

Protected Content