जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना एक एक नवीन खाते दिले असून मलाही माहिती आणि जनसंपर्क हे खाते दिले आहे. जी जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आहे ती जबाबदारी मी अधिवेशनात पार पाडणार असल्याचे मत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
ना. गुलाबराव पाटील यांनी पुढे सांगितले की, नेत्यांनी जी जबाबदारी दिली असतात ती पार पाडण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी असते आणि निश्चितपणाने त्या त्या खात्याचे प्रश्न विधानसभेतील येतील त्याला योग्य न्याय देण्याचा मी प्रयत्न करेल.
बोम्माई यांना नरेंद्र मोदी – अमित शहा सरळ करतील
दरम्यान सीमावादावर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी अमित शहा यांच्याशी भेटल्यावर कुठलाही फरक पडणार नाही अस वक्तव्य केल आहे. मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली असून अस जर कर्नाटकचे मुख्यमंत्री वक्तव्य करत असतील तरीही उन्मादाची बाब आहे. असा हल्लाबोल मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
अमित शहा भाजपचे मोठे नेते आहेत तसेच ते या देशाचे गृहमंत्री असल्याने कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे व कर्नाटकचे मुख्यमंत्री जर त्यांच्या सांगण्यावरही काही फरक पडत नाही असं बोलत असतील तर कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना रग आला आहे. याला रगाची भाषा म्हणतात. त्यामुळे असे किती बोम्मई नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पाहिले असतील, ते बोम्मई यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाही असेही मत यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.