धरणगाव, प्रतिनिधी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उद्या सोमवार २७ रोजी पार पडणार आहे. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, धरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी जळगावी घेवून जाण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत होत्या. गंभीर रुग्णांना जळगावी घेवून जाण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत होत्या हीबाब शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व शिवसेना तालुकाप्रमुख गजानन पाटील यांनी पालकमंत्री व पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. ना गुलाबरावजी पाटील यांनी ही अडचण लक्षात घेऊन तत्काळ स्वतःच्या आमदार विकास फंडातून सर्व सोयींनी युक्त असलेली मतदार संघातील पहिली कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस पासून म्हणजेच २७ जुलै पासून लोकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. कार्यक्षम व संवेदनशील मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या रुग्णवाहिकेचे धरणगाव येथे ग्रामीण रुग्णालयात सकाळी ११ वाजता हा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यामुळे सोमवारपासून ही रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावणार आहे. कोणत्याही रुग्णाला रुग्णवाहिकेची आवश्यकता भासल्यास त्यांनी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन व नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपजिल्हाप्रमुख पीएम पाटील यांनी केले आहे.