जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत आयोजीत कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उद्या जळगावात येत आहेत.
जळगाव जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्याची माहिती जाहीर केली आहे. यानुसार- दि. 27 रोजी जळगाव शहरात पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव या ठिकाणी दुपारी 2.30 बाजता शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाला गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा आणि गिरीश महाजन, ग्रामविकास आणि पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा युबक कल्याण मंत्री हे देखील उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम स्थळावर सकाळी 8.30 वाजेपासून मोफत आरोग्य तपासणी शिबीर ठेवले असून सदर ठिकाणी रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे. सदर आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच नूतन मराठा विद्यालय या ठिकाणी महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे ठिकाणी जिल्ह्यातील सर्व विभागांच्या मार्फत एकूण 25 स्टेलची शासकोय योजनांची माहिती व सेवांचा लाभ देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमाला येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था एकलव्य क्रीडा संकुल मैदान, जी.
एस. मैदान, शिवाजी पुतळा, सागर पार्क, नेरी नाका ट्रॅव्हल्स समोरील मैदान, खान्देश सेंट्रल मौल या
ठिकाणी करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’चा मुख्य कार्यक्रम दुपारी 2.30 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव या ठिकाणी होणार असून सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिक व लाभार्थी यांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. अमन मित्तल, जिल्हाधिकारी जळगाव यांनी केलेले आहे.