मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संगणक परिचालकांचे थकीत मानधनासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेला देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगणक परिचालकाचे गेल्या चार महिन्यांपासून मानधन अदा करण्यात आलेली नाही. मानधन न मिळाल्याने परिचालकांना उदरनिर्वाहसाठी अर्थिक परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. शिवाय प्रत्येक तालुक्यातील मिटींगमध्ये नवीन ऑनलाईन ई-ग्रामसॉफ्ट प्रणालत १ ते ३३ नमुन्यांची डाटा एंट्रीची वेळ ठरवून देत आहे. सर्वांना कामावरून कमी करण्याची तंबी दिली जात आहे. तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींना संगणक, प्रिंटर नादुरूस्त व इंटरनेट सुविधा देखील उपलब्ध नाही. स्वत:च्या खिश्यातून खर्च करून इंटरनेट साठी रिचार्ज करावा लागत आहे. सांदर्भात संगणक परिचालकांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्या सोडविण्यात याव्यात या मागण्यांसाठी संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.