मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील निमखेडी येथील मूळ रहिवासी तथा सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असणारे विपीन जनार्दन खर्चे यांना वीरगती प्राप्त झाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणीताई खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून निमखेडी येथील मूळ रहिवासी तथा सध्या भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असणारे विपीन जनार्दन खर्चे यांना हौतात्म्य प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने निमखेडी येथील पोलीस पाटलांशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला.
नायब सुभेदार विपीन खर्चे हे जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथे सेवेत होते. त्यांचे वाहन दरीत कोसळल्याने त्यांना विरमरण प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.