मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील मुख्य चौकात दरवर्षीप्रमाणे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त जवान कडू घुले यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दररोज राष्ट्रगीत म्हणून सन्मान करण्याचा कार्यक्रम भारतात सर्वप्रथम तेलंगणा राज्यातील जम्निकुंटा या गावात सुरू करण्यात आल्या. नंतर भरतात दुसरे शहर दररोज सार्वजनिक ठिकाणी सकाळी 8 वा संपूर्ण शहरात राष्ट्रगीत म्हणण्याच्या उपक्रम मुक्ताईनगर शहरात सुरू करण्यात आला. सदरील उपक्रमाला लोकमत, सकाळ व पुण्यनगरी वृत्तपत्रात प्रसिद्धी मिळाल्या नंतर गावातील एक युवकाने ट्विटर वर माहिती टाकल्या नंतर सदीचे महानायक अमिताभ बच्चन सरांनी त्यांच्या ट्विटरवर कवतुक करून प्रणाम असे लिहुन पाठविले होते. या उपक्रमास बब्बलु सापधरे, धनंजय सापधरे, अक्षत जाधव, विवेक पोहेकर, दिपक धायडे, गजानन मालगे, पुरुषोत्तम पोलाखरे, संतोष सापधरे, प्रशांत देशमुख(बंटी), तसेच मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी, ओम साई सेवा फौंडेशन, वंदे मातरम ग्रुप व सर्व सामजिक राजकीय ग्रामस्थ मदत करत असतात.