नवी दिल्लीः वृत्तसंस्था । रिलायन्स रिटेल आणि किशोर बियाणी यांच्या फ्युचर ग्रुपमधील 24,713 कोटी रुपयांच्या करारामध्ये मुकेश अंबानींना मोठा धक्का बसला आहे. अमेझॉनची बाजू सुप्रीम कोर्टाने उचलून धरली
या कराराची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ लवादाचा निर्णय लागू करण्यायोग्य आहे अशी भूमिका घेतली . या लवादाने फ्युचर रिटेल डीलवर स्थगिती आदेश जारी केला होता.
रिलायन्स रिटेलसोबत फ्युचर रिटेलचा 3.4 बिलियनचा करार तात्काळ भूमिका घेणाऱ्या लवादाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास पात्र आहे, असंही सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलेय. फ्युचर रिटेलने आपला संपूर्ण व्यवसाय रिलायन्स रिटेलला विकला होता. अॅमेझॉनने रिलायन्स आणि फ्युचर कराराला विरोध केला होता आणि त्यावर स्थगितीची विनंती केली होती.
हा निकाल आल्यावर रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. सकाळी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1.79 टक्के (38.30 रुपये) घसरून 2095.95 रुपयांच्या पातळीवर आला. रिलायन्सच्या घसरणीमुळे बाजारातही घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स 157 अंकांच्या घसरणीसह 54335 च्या पातळीवर व्यवहार करत होता आणि निफ्टी 22 अंकांनी 16272 च्या पातळीवर घसरला होता. सेन्सेक्समध्ये सध्या रिलायन्सला मोठा तोटा सहन करावा लागतोय.