सामनेर येथे कृषीदुताचे शेतकऱ्यांना मागदर्शन

नांद्रा ता. पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे कृषिकन्या विद्यार्थीनीने देऊन ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना कृषी विषयावर मार्गदर्शन व विविध विषयांसह शेतीविषयक माहिती देण्यात आली.

दोंडाईचा येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत विकासरत्न सरकार साहेब रावल कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनी माधुरी बाळकृष्ण साळुंखे यांनी सामनेर ग्रामपंचायतीला भेट देऊन यावेळी ग्रामस्थांच्या अडचणी आढावा जाणून घेत ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्याशी समन्वय साधून माहिती घेतली. तसेच यावेळी शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती देत विविध प्रात्यक्षिक करून दाखवले. याप्रसंगी सरपंच संगीता उपसरपंच बाळकृष्ण पाटील, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र साळुंखे, महेंद्र साळुंखे, महेश पाटील, भालचंद्र चव्हाण, भोलेनाथ भिल ग्रामविकास अधिकारी वाय.आर.अडांगळे, ग्रामस्थ चिंतामण बडगुजर, सुरेश चव्हाण, प्रशांत साळुंखे, बाळकृष्ण साळुंखे, शिवाजी चव्हाण, किशोर पाटील, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content