मुंबई (वृत्तसंस्था) तुम्ही एक तरी निवडणूक लढवून दाखवा. एक मुंबई शहर सांभाळता येत नाही आणि देशाच्या वार्ता करतायं, अशा शब्दात भाजपाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तून रोखठोक या सदरात मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. ‘तिकडे रशियाने कोरोनाची लस काढली. WHO लाही विचारले नाही. आम्ही मात्र आमच्याच मस्तीत आहोत,’ अशी टीका राऊत यांनी केली. राऊत यांच्या टीकेवर पलटवार करण्यासाठी भाजपकडून निलेश राणे उत्तर दिले आहेत. आपल्या ट्विटर हँडलवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. ‘तू दिल्ली बिल्ली सोड आधी एक निवडणूक लढवून दाखव. मुंबई नाही सांभाळता येत…लागला देशाच्या वार्ता करायला,’ अशा कडवट शब्दांमध्ये निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.