पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | माहिजी ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून येथील सरपंच पदाच्या रिक्त जागेवरच शोभाबाई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माहेजी ता. पाचोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच कमलबाई पाटील यांच्या अकस्मात निधनानंतर रिक्त असलेल्या पदासाठी दि. २८ सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत चांद बी. शे. युनुस व शोभाबाई रमेश पाटील यांचे प्रत्येकी एक अर्ज असे दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खंदे समर्थक व पॅनल प्रमुख आबासाहेब पाटील यांचे विश्वासू युनुस मेंबर यांच्या पत्नी चांद बी शे. युनुस यांनी पक्ष निष्ठा दाखवत वरिष्ठांच्या आदेशानुसार माघार घेतल्याने शोभाबाई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी आबासाहेब पाटील, दिवंगत सरपंच सुपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उप जिल्हाअध्यक्ष नरेश पाटील, गौतम साळवे, उप सरपंच कैलास पाटील, नजराना शेख अल्लाउद्दीन, युनुस मेंबरसह ग्रामस्थ उपस्थित होते. शोभाबाई पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर उपस्थितांनी नवनिर्वाचित सरपंच शोभाबाई पाटील यांचे स्वागत करून उपस्थितांचे आभार नरेश पाटील यांनी मानले.