सामनेर ग्रामपंचायतीवर प्रगती पॅनलचा झेंडा

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील सामनेर येथील सरपंचपदी प्रगती पॅनलच्या संगीता भिल बिनविरोध तर उपसरपंचपदी बाळकृष्ण साळुंखे यांची निवड झाली प्रगती पॅनल च्या सहा जागा निवडून आल्या आहेत. 

सामनेरच्या सरपंच, उपसरपंच निवडणूक बुधवार दि. १७ रोजी निवडणूक झाली प्रगती पॅनलने सहापैकी सहा जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले आहे. सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते त्यामुळे सरपंच पदासाठी संगीता भील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदासाठी बाळकृष्ण साळुंखे व महेश पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यात बाळकृष्ण साळुंखे यांची निवड झाली दुपारी दोनला ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आर. एस. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निवडीची घोषणा करण्यात आली.  सभेला ग्रामपंचायत सदस्य रवींद्र साळुंखे, महेंद्रकुमार साळुंखे, मुकेश सोनकुल, महेश पाटील, कोकिळा साळुंखे, कल्पना साळुंखे, पूनम साळुंखे, मालुबाई चव्हाण, मनिषा पाटील आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर सहायक म्हणून आर. एन. सोनवणे यांनी काम पाहिले. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने पो. कॉ. सचिन पाटील, पोलीस पाटील अरुण गोसावी यांनी बंदोबस्त ठेवला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

Protected Content