

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील पुनगाव – मांडकी गृप ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या भारती प्रल्हाद गुजर यांची सरपंचपदी तर अनिल बारकू पाटील (टिल्लू आप्पा) यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच प्रविण पाटील, चिंतामण पाटील, रविंद्र गुजर यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी पुनगाव व मांडकी ग्रामस्थांकडून नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


