मालवाहू रिक्षा घेण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव प्रतिनिधी । मालवाहू गाडी घेण्यासाठी माहेरहून पंचवीस हजार रूपये आणावे यासाठी पत्नीस मारहाण करणाऱ्या पतीसह पाच जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आज शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेली माहिती अशी की, तस्मीयाबी अमीर खान (वय-२८) रा. नागझिरी ता. रवेर ह.मु. अक्सानगर जळगाव यांचा विवाह २९ मार्च २०१४ मध्ये रितीरिवाजानुसार अमिर खान अफसर खान यांच्याशी झाला. लग्नाच्या सहा महिन्यांपर्यंत पतीसह सासरच्या मंडळींनी वागवणूक चांगली दिली. दरम्यान, पती अमिर खान हे मालवाहू वाहतूकीचा व्यवसाय करतात. स्वत:ची गाडी घ्यावी यासाठी पत्नी तस्मीयाबी यांना माहेरहून २५ हजार रूपये आणावे याची मागणी केली. परंतू आईवडील गरीब असल्यामुळे वाहवाहू गाडी घेण्यासाठी पैसे देवू शकत नाही असे सांगितले असता पती अमिर खान याने विवाहितेला मारहाण करण्यास सुरूवात केली. यासाठी सासरे अफसर खान सुजात खान, सासू नसीमबी अफसर खान, नणंद रजियाबी अफसर खान, दीर कौसर खान अफसर खान सर्व रा. नागझिरी ता. रावेर यांनी पाठबळ देवून शिवीगाळ केली. विवाहितेला हा त्रास सहन न झाल्याने कंटाळून जळगावातील अक्सानगरात माहेरी निघून आल्यात. विवाहितेच्या फिर्यादीवरून आज शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे. 

 

Protected Content