दुचाकी घसरल्याने दोघे गंभीर जखमी

जळगाव प्रतिनिधी । कडगाव येथे लग्नासाठी जात असतांना दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी कालिंकामाता मंदीराजवळ घडली. दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, शेख जाहीर शेख लुकमान (वय-४५) रा. पिंप्राळा, जळगाव हा तालुक्यातील कडगाव येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी दुचाकीने सकाळी ११ वाजता घरून निघाला. शहरातील अजिंठा चौफुलीवर उभा असलेला मित्र शेख साफीर शेख शरीफ (वय-३२) रा. नशिराबाद याला दुचाकीवर बसवून कालिंकामाता कडून जात असतांना अचानक दुचाकी घसरल्याने दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content