नवी दिल्ली: वृत्तसंस्था । मार्च महिन्यात ११ दिवस बँका बंद राहतील वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असतील
देशातील सर्व बँकांना ही ११ दिवसांची सुट्टी राहणार आहे.
फक्त वेगवेगळ्या राज्यात या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असतील. काही राज्यांत, स्थानिक सणांच्या आधारे बँकांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात येतील. आपल्याकडेही मार्च महिन्यात बँकेशी संबंधित काही विशेष कामं असल्यास आताच करून घ्या.
मार्चमध्ये होळी आणि महाशिवरात्रीसह ११ दिवस बँकांना सुट्टी असेल. यापैकी ५, ११ , २२ , २९ आणि ३० मार्च रोजी बँकांना सुट्टी असेल. त्याशिवाय ४ रविवार आणि २ शनिवारीही बँका बंद राहतील.
मार्चमध्ये बँकांना असलेल्या सुट्ट्या — ५ मार्च, शुक्रवार, फक्त मिझोरममध्ये सुट्टी , ७ मार्च, रविवार , ११ मार्च, गुरुवार, महाशिवरात्री , १३ मार्च, दुसरा शनिवार , १४ मार्च, रविवार , २१ मार्च, रविवार , २२ मार्च, सोमवार, बिहार दिन, फक्त बिहारमध्ये सुटी , २७ मार्च, चौथा शनिवार , २८ मार्च, रविवार, होळी
२९ मार्च, सोमवार, धूलिवंदन , ३० मार्च, मंगळवार, राजस्थान दिवस
देशभरात रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधेसाठी रिझर्व्ह बँकेचे नवे नियम लागू झालेत. त्यानुसार आता ही सुविधा सदैव उपलब्ध आहे. अशा प्रकारची सुविधा पुरवणारा भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेकडून एनईएफटी सुविधा सदैव सुरू करण्यात आली होती. RTGS मध्ये किमान 2 लाख रुपये ते कमाल कितीही पैसे एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात हस्तांतरित करता येतात. बँका बंद असल्या तरी आपल्याला ऑनलाईन व्यवहार करणं सहजशक्य होणार आहे.