मारियांच्या ‘त्या’ दाव्याचे उज्ज्वल निकमांकडून समर्थन !

rakesh mariya and nikam

 

मुंबई (वृत्तसंस्था) हो हे खरं आहे की ओळखत्रांत दहशतवाद्यांची नाव हिंदू नमूद करण्यात आली होती. मुंबई कोर्टात कसाबने दिलेल्या जबाबात १० दहशतवाद्यांकडे १० बनावट ओळखपत्रं होती, हे समोर आले होते. या ओळखपत्रांचा वापर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी केला जाणार होता, हे आम्ही कोर्टासमोर सिद्धही केले, अशा शब्दात २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ला प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राकेश मारिया यांच्या दाव्यांचे समर्थन केले आहे.

 

पाकिस्तानी दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तोयबा’नं २६/११ चा हल्ल्याला ‘हिंदू दहशतवादा’चा रुप देण्याचा कट रचला होता, असा खुलासा तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्यावर ‘आयएसआय’चा हस्तक आणि गुप्तचर असल्याचा आरोप केला. त्यावर दिग्विजय सिंह यांनी आपण भाजप नेते जी व्ही एल नरसिम्हा राव आणि भाजपचे मीडिया सेल अध्यक्ष अमित मालवीय यांच्यावर मानहाणीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी राकेश मारिया यांनी केलेल्या दाव्यांना दुजोरा दिला आहे.

Protected Content