रावेर : प्रतिनिधी । ट्रक थांबवल्यावर बळजबरीने आत जाऊन ट्रकचालकाला मारहाण करीत त्याच्याकडून रोख रक्कम आणि मोबाइल फोन हिसकावून घेणाऱ्या ३ आरोपींना रावेर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे .
गौरव विजय बिरपण , भूषण धनराज विचवे ( दोन्ही रा . भटखेडा) , मनिष सुरेश पवार ( रा गुलमोहर हॉटेलच्या मागे, रावेर) अशी या आरोपींची नावे आहेत .ट्रकचालक अमीन भूत्तो समसोद्दिन भूत्तो ( रा – चिर्या , ता – जि खरगोन , मध्य प्रदेश ) यांच्या फिर्यादीवरून या आरोपींविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९४, ३९७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
१७ फेब्रुवारीरोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास रावेर ते सावदा रॊडवर बिबे पेट्रोल पंपच्या पुढे या आरोपींनी या ट्रकचालकाला लुटले होते
फिर्यादी चालक या मालट्रक मध्ये तूर भरून अकोला येथे पाल ,कुसुम्बा ,रावेर मार्गे जात होता त्यांनी फिर्यादी चालक व त्याच्या साथीदारांवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते पोलिसांनी तात्काळ ३ संशयितांना ताब्यात घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांना दाखविले असता त्यांनी आरोपींना ओळ्खल्याने अटक केली होती
तपास अधिकारी सपोनि शितलकुमार नाईक , डीवायएसपी श्री पिंगळे , पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी हि कारवाई केली