मातोश्रीवर खोके येणे बंद झाल्याची रश्मी ठाकरेंना खंत ! : दीपाली सैयद

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दीपाली सैयद यांनी अखेर शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची प्रसारमाध्यमांना माहिती देतांना त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यासह उध्दव ठाकरे व त्यांच्या सहकार्‍यांवर जोरदार टीका केली.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना नेत्या दीपाली सैयद या शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी आज अधिकृतपणे याला दुजोरा दिला. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी याची माहिती देत उध्दव ठाकरेंसह अन्य नेत्यांवर जोरदार टीका केली.

दीपाली सैयद म्हणाल्या की, राऊतांमुळे पक्ष फुटला. शिवसेनेचे दोन वेगळे गट झाले. एकनाथ शिंदेंनी मला शिवसेनेत आणलं. त्यामुळे मी त्यांच्यासोबत उभी आहे. ते माझं कर्तव्य आहे. दरम्यान, महापालिकेतील खोके मातोश्रीवर येण्याचं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना लागली आहे. सुषमा अंधारे आणि निलम गोर्‍हे या सर्व चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा महत्त्वाच्या सूत्रधार रश्मी ठाकरे असल्याचा सनसनाटी आरोप देखील त्यांनी केला.

दीपाली सैयद यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. त्या म्हणाल या की, आम्ही पक्षात काम करत होतो. पक्षाबरोबर आपणही आपलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे असं आम्हाला वाटत होतं. प्रत्येकालाच तसं वाटतं. पण आमचा पक्ष फुटला. पण पक्ष ज्या कारणांमुळे फुटला ते माहीत झाले. संजय राऊत यांच्यामुळेच पक्ष फुटला. त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली आहे. तसेच समोरून एक पाऊल पुढे टाकलं गेलं नाही. त्यामुळे पक्ष एकसंघ होऊ शकला नाही, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.

 

Protected Content