जळगाव, प्रतिनिधी । भीम जयंती समूह संचालित फुले शाहू आंबेडकर साहित्य मंच जळगाव आयोजित माता रमाबाई आंबेडकर स्मृती दिनानिमित्त ऑनलाइन काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे.
फुले शाहू आंबेडकर साहित्य मंचतर्फे आयोजित स्पर्धेत माता रमाबाई आंबेडकर या विषयांवर २५ ते २७ मेच्या रात्री बारा वाजेपर्यंत स्वरचित काव्य लेखन स्पर्धेचा कालावधी असणार आहे. विजेत्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी एक कविता पाठवावी. कविते खाली आपले नाव, गाव ,मोबाईल नंबर लिहावा. ही स्पर्धा आर. जे. सुरवाडे यांनी आयोजित केली आहे. परीक्षक म्हणून ज्योती उत्तमराव वाघ व सुखदेव वाघ हे काम पाहणार आहेत. संकलन ज्योती राणे, समूह संचालिका चित्रा पगारे तर ग्राफिक यश सुरवाडे यांचे आहे. स्पर्धेचा निकाल पुढील आठ दिवसांत लागणार आहे. तरी ऑनलाईन कवितेस्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://chat.whatsapp.com/IQgBlNg8jMLE8zHFh9cb4y या ग्रुपला ज्वाईन करावे लागणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.