अमळनेर येथे शासकीय कर्मचाऱ्यांचा संप ; कामकाज ठप्प

 

अमळनेर, प्रतिनिधी । जुनी पेन्शन योजना, कंत्राटी पद्धत व विविध विभागाच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपात महसूल कर्मचारी , शिक्षक संघटना ,वीज कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना,पंचायत समिती कर्मचारी अशा विविध संघटना सहभागी झाल्याने या विभागांचे कामकाज ठप्प होते.

उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय कर्मचाऱ्यांनी सकाळी संविधानाची शपथ घेऊन प्रांताधिकारी सीमा अहिरे ,तहसीलदार मिलिंद वाघ याना निवेदन देऊन संपात सहभागी असल्याचे कळवले. यावेळी दिनेश सोनवणे, बागुल , राजेंद्र शिरसाठ, संदीप पाटील, विजय धमके ,अमोल पाटील, कपिल पाटील, सुनील गरूडकर, मैराळे , चव्हाण हजर होते. वीज कर्मचाऱ्यांनी देखील अत्यावश्यक सेवा वगळता संप १०० टक्के यशस्वी केल्याचा दावा संघटनेचे राज्य सचिव पी. वाय. पाटील यांनी केला आहे. शाळेचे शिक्षण जरी बंद आहे तरी शिक्षक संघटना देखील संपावर होत्या. ग्रामसेवक संघटना देखील संपावर असल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज बंद होते.

Protected Content