जामनेरात आनंदयात्री परिवारातर्फे आयोजित दिवाळी पहाटने रसिक मंत्रमुग्ध

जामनेर, प्रतिनिधी | जामनेर पंचायत समिती आवारामध्ये आनंद यात्री परिवारातर्फे आयोजित दिवाळी पहाट या कार्यक्रमात कलर्स वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा फेम सुप्रसिद्ध गायक प्रशांत काळूनद्रेकर व सौ मेघना काळूनद्रेकर यांनी सुरेल रंग भरले.

 

प्रशांत काळूनद्रेकर व सौ मेघना काळूनद्रेकर यांच्या जुने-नवे शास्त्रीय गीते, भक्ती गीते, नाट्यसंगीत अभंग,गझल,भूपाळी,मेलडी अश्या विविध संगीत प्रकारांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. आनंदयात्री परिवारातर्फे दरवर्षी दिवाळी पहाट चे आयोजन होत असते. यंदाचे हे दुसरे वर्ष होते. सामाजिक जाणिवेतून सांस्कृतिक चळवळ उभी राहावी या हेतूने सर्वांना विनामूल्य व खुला प्रवेश होता. कार्यक्रमात तबला वादक राजेश कुलकर्णी, हार्मोनियम वादक श्रीरंग परब, साउंडरिदम गौतम नाईक यांनी कार्यक्रमात सुरेल साथ सांगत दिली. कार्यक्रमाचे रंगतदार निवेदन गणेश राऊत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुधीर साठे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. अमोल सेठ यांनी तर आभार प्रा. नितीन पाटील यांनी मानले.

 

यशस्वीतेसाठी आनंदयात्री परिवाराचे डॉ. अमोल सेठ, सुधीर साठे, डॉ. चंद्रशेखर पाटील, सुहास चौधरी, डॉ. आशिष महाजन, विशाल कुलकर्णी, प्रा.जे. पी. पाटील, अरुण जोशी, डॉ. पराग पाटील, प्रा. नितीन पाटील, डॉ. नीलकंठ पाटील, संदीप पवार, अमरीश महाजन यांनी कामकाज पहिले.

Protected Content